प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीसुद्धा मतदान सुरु होण्यापूर्वीच मतदानासाठी रांगेत, पहा व्हिडिओ

0
1

लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील सहा जागांवर २० मे रोजी मतदान सुरु झाले. मतदानासाठी सकाळापासून सर्वसामान्य मतदारांनी रांगा लागल्या. त्याच्याप्रमाणे बॉलीवूडमधील कलाकार, उद्योजक मतदानासाठी बाहेर पडले. राज्यातील सर्वत्र मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. मतदानास सकाळी सात वाजता सुरुवात होण्यापूर्वी मतदार रांगेत होते. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीसुद्धा मतदान सुरु होण्यापूर्वी रांगेत लागलेले दिसन येत आहे. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

देशात सर्वसामान्य व्यक्तीपासून बड्या व्यक्तीपर्यंत सर्वांना मतदानाचा समान अधिकारी आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिलायन्स अनिल धीरूभाई अंबाणी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानीसुद्धा सकाळीच बाहेर पडले. सकाळी ६.४५ च्या सुमारास मतदान सुरु होण्यापूर्वी ते रांगेत लागले होते. कुलाबा मतदान केंद्राबाहेर मतदान सुरु होण्याची ते वाट पाहत होते. कप परेडमध्ये राहणारे अनिल अंबानी रांगेत काही जणांशी संवाद साधत होते. त्या रांगेत त्यांचा आठ ते दहावा क्रमांक दिसत होता. मुंबईतील गर्मीचा त्रास त्यांना होत होता. अनिल अंबानी रांगेत उभे असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. २८ सेंकदाचा हा व्हिडिओ असून त्यात अनिल अंबानी मतदान केंद्राबाहेर वाट पाहताना दिसत आहे.

पहा व्हिडीओ :

x.com/ANI/status/1792367355764613401