‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची समीकरणं अनेकदा बदललेली पाहायला मिळत असतात. या आठवड्यात अरबाजने घेतलेली पलटी घरातील सदस्यांना खटकली आहे. मागचा भाऊचा धक्का झाल्यानंतर अरबाजने एका क्षणात पलटी मारली होती. घरातील सदस्यांना सल्ले देणारा अरबाज निक्कीच्या वेळी कुठे जातो असा प्रश्न चाहत्यांनाही आता पडू लागला आहे. दरम्यान भाऊच्या धक्क्यावर अरबाज मोठा पलटीबाज असल्याचं अभिजीत बोलताना दिसून येणार आहे.
आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी अरबाज आणि निक्कीचीच शाळा घेतल्यांचं पाहायला मिळालंय. इतकच नव्हे तर अभिजीतसह घरातील इतर सदस्यांनीही अरबाजच्य वागण्यावर तीव्र संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर आज अरबाज आणि निक्कीचा क्लास लागणार आहे.
असा माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाही – अभिजीत सावंत
अरबाजच्या पलटी मारण्यावर अभिजीत म्हणाला,”अरबाज पलटी मारणार यावर माझा विश्वास होताच. पण इतकी मोठी पलटी अशा पद्धतीने तो मारेल याबद्दल जरा वाईट वाटलं. घरातील सर्व सदस्यांचा त्याने विश्वासघात केला आहे. जान्हवीने त्याला किती सांभाळलं आहे. त्याच्यासाठी वैभवने निक्कीला सुनावलं होतं की,”काहीही झालं तरी मला बोल पण त्याला काही बोलू नको. त्याच्याजवळ जाऊ नको आणि क्षणातच अशा पद्धतीने फिरणारा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही”.
‘अरबाज निक्कीचं पायपुसणं…’
भाऊच्या धक्क्याचा समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,”अरबाज स्ट्राँग प्लेअर ही इमेज तुम्ही जी तयार केली होती ती मातीत मिळवली आहे. त्यावर अरबाज म्हणतो,”सर मी केअर करतोय कोणाची तरी”. त्यावर अरबाजला थांबवत रितेश भाऊ म्हणतो,”तुम्हाला समजत नाही…तुम्ही केअर करताय असं तुम्हाला वाटतं”. त्यानंतर घरातील इतर सदस्यांना रितेश भाऊ प्रश्न विचारतो की,”इथे कोणाला वाटतं अरबाज निक्कीचा डोअरमॅट होऊन पायापुढे येत होता?”.
पहा प्रोमो:
instagram.com/reel/C_m-NbYNiK5