गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यवर लगेच कारवाई गृहमंत्रांचा आदेश…!

0
24

माणदेश एक्सप्रेस/पुणे : गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य होत आहेत हे खरे आहे; पण सर्वसाधारणपणे अशा घटना घडल्यावर पोलिस लगेच कारवाई देखील करत आहेत, अशा शब्दांमध्ये बीड प्रकरणाचा थेट उल्लेख न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे मान्य केले.

 

पुण्यात गुरुवारी सायंकाळी एका कार्यक्रमासाठी आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. बीड प्रकरण व राज्यात एकूणच वाढलेल्या गुन्हेगारीकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी गुन्हे वाढल्याचे अप्रत्यक्षपणे मान्यच केले. ते म्हणाले, काही गोष्टी घडत आहेत हे खरे आहे; पण म्हणून वाढ झाली असे म्हणता येणार नाही. अशा प्रकरणात पोलिस तातडीने कारवाई करतात.