लॉरी आणि एम्बुलेंसची जोरदार धडक; तीन महिलांसोबत सहा लोकांचा मृत्यू

0
202

पश्चिम बंगाल मध्ये भीषण अपघात झाला आहे. लॉरी आणि एम्बुलेंसची भीषण धडक झाली आहे. या अपघातामध्ये तीन महिलांसोबत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सांगितले जाते आहे की, एम्बुलेंस घाटाल मधून रुग्णांना घेऊन मेदिनीपुर मेडिकल कॉलेज जात होती. तर लॉरी मेदिनीपुर दिशा कडून केशपुर कडे जात होती. तेव्हा हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

अपघात एवढा भीषण होता की एम्बुलेंस पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली. या अपघातात तीन महिलांसोबत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली व मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.