खरसुंडीत आरोग्य शिबीर संपन्न

0
173

माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी प्रतिनिधी : खरसुंडी येथे स्व.आमदार अनिलभाऊ बाबर व तृप्ती सैंब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न झाले. आयुष मल्टीपर्पज फाउंडेशन व सुवर्णवेद फार्मास्यूटिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सुहास बाबर प्रमुख उपस्थित होते. डॉ. संतोष काटकर, डॉ.जे पी विभुते, डॉ.चंद्रकांत कोथळे, डॉ. शिवानंद कुंभार, डॉ.चंद्रकांत साबळे यांनी शिबिरात गुडघेदुखी, वात-संधिवात, कॅल्शियमची कमी, हातापायांना मुंग्या येणे, कंबर दुखी, मधुमेह या आजारावर उपचार केले. यावेळी मोफत नाडी परीक्षण करण्यात आले. शिबिरात २१७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

यावेळी खरसुंडी देवस्थानचे चेअरमन चंद्रकांत पुजारी, सिद्धनाथ विकास सोसायटीचे चेअरमन विजयकुमार भांगे, माजी उपसरपंच अर्जुन पुजारी, धनंजय सैंब, ग्रा.पं.सदस्य निलेश पोमधरणे, सुभाष माळी, विक्रम भिसे यांच्यासह मंगेश पुजारी, विनोद पुजारी, रुपेश केंगार उपस्थित होते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here