हार्दिक पंड्याच्या जोरदार शॉटमुळे बांगलादेशच्या गोलंदाजच्या तळहाताला तब्बल ‘इतके’ टाके

0
8

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी शनिवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना खेळला गेला. या सराव सामन्यात बांगलादेश भारताकडून ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताच्या १८३ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला १२२ धावाच करता आल्या. सराव सामन्यात बांगलादेशचा एक स्टार खेळाडू जखमी झाला असून हा खेळाडू विश्वचषकातील पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली

शोरिफुल इस्लामच्या हाताला दुखापत –
भारताविरुद्धच्या सराव सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लामला दुखापत झाली आहे. भारताविरुद्ध त्याला चार षटकांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्याने भारतीय डावातील शेवटचे षटक टाकले आणि या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शोरिफुल इस्लामने यॉर्कर चेंडू टाकला, त्यानंतर हार्दिक पंड्याने त्यावर जोरदार शॉट मारला, शोरिफुलच्या दिशेने गेला आणि त्याच्या तळहातावर जोरदार आदळला. त्यामुळे त्याला तत्काळ मैदान सोडावे लागले. वेगवान चेंडूचा फटका बसल्याने त्याचा तळहात सुजला होता. त्यानंतर त्याला सहा टाके पडले. शोरिफुल इस्लामच्या षटकाचा उरलेला चेंडू तनझीम हसनने टाकला. भारताविरुद्धच्या सामन्यात शरीफुलने ३.५ षटकांत २६ धावांत एक विकेट घेतली. त्याने भारताकडून सलामीला आलेल्या संजू सॅमसनची विकेट घेतली.

 

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकणार –
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, ही दुखापत बरी होण्यासाठी किमान एक आठवडा लागेल. याआधी, २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील बांगलादेशच्या पहिल्या सामन्यात खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. बांगलादेशला ८ जूनला श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे. शोरिफुलची दुखापत बांगलादेशसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. शोरीफुल इस्लामची दुखापत बरी होण्यास अधिक वेळ लागल्यास बांगलादेश संघ राखीव खेळाडूचा संघात असलेल्या हसन

पहा व्हिडीओ: