ग्राहकांसाठी आनंदवार्ता! BSNL 5G Service लवकरच सुरु होणार, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून महत्वाची माहिती

0
446

खासगी दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले. त्या नाराजीतून ग्राहकांनी धडाधड सिम पोर्ट सुरु करत निषेध नोंदवला. गेल्या दहा दिवसांत बीएसएनएल कंपनीकडे सर्वाधिक सिम पोर्ट करण्यात आल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले. आता ग्राहकांना अजून एक आनंदवार्ता मिळाली आहे. BSNL 5G ची सेवेची ग्राहकांना मोठी प्रतिक्षा आहे. बीएसएनएल लवकरच 5G सेवा सुरू करणार आहे. काय आहे अपडेट?

काय आहे आनंदवार्ता
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक महत्वपूर्ण अपडेट दिली आहे. BSNL 5G ची त्यांनी स्वतः चाचणी केली आहे. बीएसएनएलची 5G सेवा लवकरच सुरु होणार आहे. कंपनीला त्यात यश मिळाले आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्समध्ये (C-DOT) ही चाचणी झाली. त्यावेळी शिंदे पण उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी व्हिडिओ कॉल केला आणि BSNL च्या 5G सेवेची चाचणी केली. यावेळी त्यांनी बीएसएनएलच्या 5जी नेटवर्कची क्षमता जोखली.

चाचणीला यश

ही चाचणी यशस्वी झाल्याने आता लवकरच BSNL 5G नेटवर्क सुरु होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे बीएसएनएलकडे मोठ्या प्रमाणावर ग्राहक येण्याची शक्यता आहे. सध्या जिओ, व्होडाफोन-आयडिया, एअरटेलच्या अनेक ग्राहकांनी बीएसएनएलकडे मोर्चा वळवला आहे. 5G नेटवर्क सुरु झाल्यास ग्राहकांचा बीएसएनएलकडे ओढा वाढेल. टेक तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी जलद 5जी इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्याची वकिली केली आहे.

5G सोबतच 6G च्या चर्चेला जोर

5G ची सेवा सुरु होण्याची प्रतिक्षा असतानाच आता 6G च्या चर्चेला जोर चढला आहे. 6G सेवेसाठी पण चाचपणी सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. 6G तंत्रज्ञानावर पण केंद्र सरकारने काम सुरु केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी याविषयीची माहिती दिली. आता तंत्रज्ञानाता बीएसएनएल मागे राहून चालणार नाही. जगभरात 6G तंत्रज्ञान विकसीत होत असताना आपण मागे राहून चालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 5G सोबतच 6G च्या चर्चेला जोर चढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here