माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील ज्वेलर्स दुकानदारांनी चोख सोने देवून त्याचे दागिने बनवून देण्यासाठी दिलेले सोने घेवून कोलकाता येथील बाप-लेक फरार झाले असून, तब्बल अंदाजे २० ते ३० कोटी रुपयांचे सोने लंपास केल्याची घटना घडली असल्याने आटपाडी तालुक्यासह सांगली जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी शहरामध्ये गेली ३० ते ३५ वर्षापासून गौतम दास हे राहण्यास होते. त्यांनी आटपाडी शहातील सर्व ज्वेलर्स दुकानदार यांच्याकडून सोने घेवून त्याचे दागिने बनवून देण्याचे काम करत होते. गेली ३० ते ३५ वर्षापासून तो आटपाडी शहरात वास्तव्यास असल्याने त्याच्यावर आटपाडी शहरातील सर्व ज्वेलर्स धारकांचा विश्वास बसला होता.
आटपाडी शहरातील प्रतिष्ठीत व नावाजलेल्या ज्वेलर्स दुकानदारांनी त्याच्याकडे चोख सोने देवून सोन्याचे दागिने बनवून देण्यासाठी दिले होते. परंतु सदरचे सोने घेवून गौतम दास व सौरभ दास हे फरार झाले असून यामुळे आटपाडी तालुक्यासह जिल्ह्यातील ज्वेलर्स धारकांची तब्बल अंदाजे २० ते ३० कोटी रुपयांचे सोने घेवून गायब झाले असल्याने आटपाडीतील ज्वेलर्स धारकांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद झाले आहेत.