सरकारकडून मिळतेय फुकट वीज; फक्त कराव लागेल ‘हे’ काम

0
19

केंद्र सरकार गरजू आणि गरीब नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते. यामध्ये आता एका नवीन योजनेचा समावेश होणार आहे. ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ असं या योजनेचं नाव आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना जाहीर केली होती. ज्या अंतर्गत 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे ध्येय ठेवण्यात आलं आहे. या अंतर्गत एक कोटी कुटुंबांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिवाय, शिल्लक राहिलेली वीज विकून तुम्ही नफा देखील कमवू शकता. केंद्र सरकार या योजनेअंतर्गत अनुदानही देणार आहे.

तुम्हालाही पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सोलर पॅनेल बसवावे लागतील. हे सोलर पॅनल बसवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी सविस्तरपणे जाणून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून योजनेचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. सोलर पॅनल लावण्यासाठी लागणारा खर्च त्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळा असू शकतो. एक किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलची किंमत सुमारे 90 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी सुमारे दीड लाख रुपये आणि तीन किलोवॅटसाठी दोन लाख रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो.

राहत्या घरासाठी रूफटॉप सोलर पॅनेल बसवण्यासाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सबसिडीसाठी अर्ज करता येईल. या योजनेअंतर्गत एक किलोवॅटसाठी 18 हजार रुपये, दोन किलोवॅटपर्यंत 30 हजार रुपये आणि तीन किलोवॅटसाठी 78 हजार रुपये सबसिडीसाठी दिली जाईल. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी भार 85 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.

चार वर्षांत किती वीज बचत होईल?

छतावर सौर पॅनेल बसवणं ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. एक किलोवॅट क्षमतेचं पॅनेल 120 किलोवॅट तासांपर्यंत वीज निर्माण करू शकते. तीन किलोवॅट सोलर पॅनलमधून प्रति युनिट सात रुपये या प्रमाणे 30 हजार 240 रुपये एकूण वार्षिक बचत होऊ शकते. तीन किलोवॅटसाठी दोन लाख रुपये खर्च येतो आणि 78 हजार रुपये सबसिडी मिळते. सबसिडी वजा केल्यास 1.2 लाख रुपये खर्च होईल. म्हणजे एकूण चार वर्षात तुम्ही दरवर्षी 30 हजार रुपयांची वीज वाचवून संपूर्ण खर्च वसूल करू शकाल.