
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथील ऊसतोड मुकादमाची आर्थिक फसवणूक ऊसतोड मजुर पुरवितो म्हणून केली असून, याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
यातील फिर्यादी प्रभाकर महीन गळवे वय 32 रा. गळवेवाडी ता. आटपाडी हे ऊसतोड मुकादम आहेत. यातील आरोपी राजु हरिदास चव्हाण, सोनाली राजु चव्हाण, शिवाजी प्रकाश मदने, सोनाली शिवाजी मदने, गौरव छगन मंडले रा. खळवे ता. माळशिरस जि. सोलापुर, नागेश उत्तम निकम रा. दसरू ता. माळशिरस जि. सोलापुर या आरोप्नी यांनी मुकादम प्रभाकर गळवे यांच्याकडून श्री सदगुरु साखर कारखाना राजेवाडी या कारखान्यास ऊस तोडणीसाठी ऊसतोड मजुर पुरवतो म्हणुन एकूण पाच लाख पाच हजार घेवून करारनामा करून दिला होता.
परंतु सदर आरोपी यांनी करारनामा देवून पैसे घेतले. पण ऊसतोड मजूर पुरविले नाहीत. करारनामा करून ऊसतोड मजुर न पुरवता करारात दिलेले पैसे आज अखेर परत न देता फिर्यादीचा विश्वासघातकरून फसवणुक केली आहे. म्हणुन सदर आरोपी विरोध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.