पुण्यातील कुमठेकर रस्त्यानजीक असलेल्या एका चार मजली इमारतील भीषण आग लागली. या आगीत जीव गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुटका करण्यात आली.पुण्यातील कुमठेकर रस्त्यानजीक असलेल्या एका चार मजली इमारतील भीषण आग लागली. या आगीत जीव गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुटका करण्यात आली. सागर कुलकर्णी असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका इमारतीत खाजगी शैक्षणिक संस्था आहे. या इमारतीत खालच्या मजल्यावर अभ्यासिका तर दुसऱ्या मजल्यावर स्टडी रूम आणि इतर दोन मजल्यावर या इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरूवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास या इमारतीला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून काही वेळातच आग विजवली. आग लागली त्यावेळी या इमारतीत ४८ मुली राहत होत्या. तळमजल्यावर आग लागल्याने घाबरून तिथे राहत असलेल्या मुलींनी टेरेसवर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व मुलींना शेजारील इमारतीवरून शिडीच्या सहाय्याने बाहेर काढले. मात्र त्या ठिकाणी काम करत असलेल्या सागर या तरूणाचा या आगीमुळे गुदमरून मृत्यू झाला. आग कशामुळे लागली ते अद्याप समजू शकलेले नाही.