दुर्दैवी घटना : गेमझोनमध्ये आगीचे तांडव ; २५ जणांचा मृत्यू ; मृत्यांचा आकडा वाढण्याची शक्यता

0
6

माणदेश एक्सप्रेस न्युज/राजकोट : गुजरातच्या राजकोट असणाऱ्या गेम झोनला भीषण आग लागली असून या आगीत आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु आगीचे रौद्ररूप पाहता, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आग कशामुळे लागली याबाबत आम्ही तपास करत असल्याचे राजकोटच्या पोलीस कमिशनर यांनी सांगितले आहे.

गेमझोनला लागलेल्या आगीत  आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असला तरी अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. गेम झोनमध्ये अजूनही अनेक लोक अडकले असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण गेम झोन जळून खाक झाले आहे. पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कालावड रोडजवळील टीआरपी गेम झोनला आग असून आग लागल्यानंतर सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. गेम झोनच्या आगीचे लोट 5 किलोमीटर अंतरापर्यंत दूर पसरले आहेत. दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here