१७ वेळा अपयशी ,आज आहे ४०,००० कोटींचा मालक

0
13

अनेकदा उच्च शिक्षण घेऊन, मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर येऊनही काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात. बऱ्याचदा हा प्रयत्न फसतो. पण, काही जण समोरील आव्हाने स्वीकारून, पुढे जाताना येणाऱ्या अडीअडचणींवर यशस्वीपणे मात करतात. आयआयटी पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांचीदेखील अनेकदा मोठमोठ्या कंपन्यांकडून मोठ्या पगारावर नियुक्ती केली जाते. सध्या जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचे प्रमुख आयआयटी पदवीधर आहेत. पण, काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य देतात. आज आम्ही अशाच एका आयआयटी पदवीधराचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत; ज्याने तब्बल १७ वेळा अपयश मिळूनही हार मानली नव्हती.

आयआयटी कानपूरचा विद्यार्थी असलेल्या अंकुश सचदेवाचा प्रेरणादायी प्रवास लाखो लोकांसाठी आदर्श उदाहरण आहे. अंकुश सचदेवाने आयआयटी कानपूरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. केले. आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर अंकुशने मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीत इंटर्न म्हणून करिअरला सुरुवात केली. पण, त्याला नोकरीत रस नसल्याने त्याने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मात्र, त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर खचून न जाता त्याने दुसरी कंपनी सुरू केली; मात्र तो प्रयत्नदेखील फसला. अशा प्रकारे एकानंतर एक अंकुशने तब्बल १७ वेळा स्टार्टअप सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. तरीही हार न मानता, तो सातत्याने प्रयत्न करीत राहिला. शेवटी १८ व्या वेळी त्याला यश मिळाले.

 

त्यावेळी त्याने शेअरचॅट नावाची कंपनी सुरू केली होती. आज त्याच कंपनीची किंमत हजारो कोटींमध्ये झाली आहे. शेअरचॅट हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून, तो लहान शहरे आणि गावांमधील लोकांना जोडण्याचे काम करते.

सध्या शेअरचॅट भारतीय लोकप्रिय अॅॉपपैकी एक
शेअरचॅट हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे; जो भारतीय लोकांसाठी बनविण्यात आला आहे. १५ विविध भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या प्लॅटफॉर्ममध्ये हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, तेलुगू, तमीळ, बंगाली, ओरिया, कन्नड, आसामी, हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी व इंग्रजी यां भाषांचा समावेश आहे. भारतातील लहान शहरे आणि गावांमधील लोकांना जोडण्यासाठी त्यांच्या भाषेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गरज आहे. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म अंकुशने सुरू केला.

अंकुश सचदेवाचे बालपण
अंकुश सचदेवाने शालेय शिक्षण सोमरविले स्कूलमधून पूर्ण केले. तसेच आयआयटी कानपूरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. केले. १७ वेळा स्टार्टअप सुरू करण्यात अयशस्वी झाल्यानंतर अंकुशने त्याचे दोन मित्र फरीद अहसान व भानू सिंग यांच्यासोबत शेअरचॅट ॲप लाँच केले. हे ॲप ऑक्टोबर २०१५ मध्ये लाँच करण्यात आले होते. जून २०२२ पर्यंत शेअरचॅटची किंमत अंदाजे $५ अब्ज म्हणजेच ४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली होती. सध्या या अॅपचे अमेरिका आणि युरोपसह जगातील सर्व देशांमध्ये लाखो वापरकर्ते आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here