‘या’ केमिकल कंपनीत स्फोट , १५ जण जखमी ,शेजारच्या इमारतीच्या काचा फुटल्या

0
2

 

डोंबिवली एमआयडीसीमधील फेज २ मधील अंबर केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी तीन बॉलरलचा स्फोट झाला. या स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले. घटनास्थळी चार अग्नीशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. कंपनीजवळ ह्यूदांई कंपनीचे शोरुम आहे. या कंपनीपर्यंत ही आग पसरली आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु १५ जण जखमी झाले आहे. या आगीनंतर केमिकल कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, या घटनेत 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

परिसरातील अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
आगीची भीषणता पाहून उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. डोंबिवली तापमान ४२ अंश सेल्सियस आहे. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्या. आगीची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

शेजारच्या इमारतीच्या काचा फुटल्या
केमिकल कंपनीला लागलेली आग इतर ठिकाणी पसरत आहे. या स्फोटामुळे कंपनी शेजारी असलेल्या इमारतीच्या कामचा फुटल्या आहेत. आगीची घटना दोन किलोमीटर लांबून दिसत आहे. अनेक जण मोबाईलवर त्याचे शुटिंग करत आहेत. आग विझवणे हे अग्नीशमन दलापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

आगीची भीषणता पाहून परिसरात राहणाऱ्या लोकांना घरातून बाहेर काढण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांचे पथक तैनात ठेवले असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. कंपनीत फायर ऑडिट झाले नसल्यास मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फायर ऑडिट होत नाहीच- आव्हाड
दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत मोठी आग लागली होती. त्या आगीची झळ घराघरातपर्यंत पोहचली होती. दोन किलोमीटरपर्यंत ती आग पसरली होती. त्यानंतर एमआयडीसी कडून फायर ऑडिट केले गेले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. नेहमी आग लागते, चौकशी होते, दोन दिवस बातम्या सुरु असतात, त्यानंतर विषय संपतो, परंतु ठोस उपाययोजना होत नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.