EVM मध्ये घोळाची भाजपलाही भीती ; मतांच्या पडताळणीसाठी राज्यातील “या” मतदार संघातील उमेदवाराची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव

0
8

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएम जिवंत आहे की मेलं, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर बंदी आणण्याची आपली मागणी कायम ठेवली होती. पण ईव्हीएममधील घोळाची भीती भाजपलाही असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनमधील मतांच्या पडताळणीसाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी अर्ज केला असून तब्बल 40 मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमधील मतांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
अहमदनगरसह तमिळनाडूतील वेल्लोर आणि तेलंगणातील जहिराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांनीही पडताळणीसाठी अर्ज दाखल कला आहे. तमिळनाडूतील विरुधनगरमधील डीएमडीकेच्या उमेदवारानेही अशी मागणी केली आहे.

तर काँग्रेसच्या छत्तीसगडमधील कंकेर तर हरियाणातील करनाल आणि फरिदाबाद मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज आले आहेत. आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसच्या विझीनागरम मतदारसंघातील उमेदवारानेही पडताळणीसाठी अर्ज केला आहे. आठ मतदारसंघातील एकूण 92 मतदान केंद्रातील ईव्हीएममधील मतांची पडताळणी करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. त्यापैकी सर्वाधिक 40 केंद्र एकट्या अहमदनगरमधील आहेत.

नगरमध्ये सुजय विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या मतदारसंघात नीलेश लंके जायंट किलर ठरले आहेत. त्यामुळे विखे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी केलेल्या अर्जाला महत्व प्राप्त झाले आहे. आता त्यातून मतांच्या आकडेवारीत काय बदल होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.