भिवंडीत डुप्लिकेट एव्हरेस्ट मटण मसाला आणि मॅगी मसाला जप्त

0
4

एका सेल्समनच्या तक्रारीवरून पोलीस पथकाने भिवंडी मार्केटमध्ये छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट मसाल्यांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भिवंडीतील एव्हरेस्ट मसाला ब्रँडेड कंपनीच्या नावाने डुप्लिकेट मटण मसाला आणि मॅगी मसाला तयार करून बाजारात विकला जात असल्याची तक्रार या एव्हरेस्ट सेल्समनने भिवंडीतील शांती नगर पोलीस ठाण्यात दिली.

शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. महेश लालन प्रसाद यादव वय 42 वर्ष आणि मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान वय 41 वर्ष असे या आरोपींची नावे आहे.
चौकशीत दोन्ही आरोपींनी सांगितले की, ते गुजरातमधील सुरत येथील गोदादरा येथून एव्हरेस्ट डुप्लिकेट ब्रँडेड मसाला आणि मॅगी मसाला आणायचे आणि नंतर महाराष्ट्रातील सर्व भागात विकायचे.

बनावट एव्हरेस्ट ब्रँडेड मसाला आणि मॅगी मसाला बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील सुरत येथील महाराणा प्रताप चौकाजवळील गोदादरा येथे छापा टाकला आणि तेथून एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात हे मसाले जप्त केले. त्याची एकूण किंमत 4 लाख 8 हजार रुपये आहे.

“डुप्लिकेट एव्हरेस्ट मटण मसाला आणि मॅगी मसाला यांच्यातील फरक म्हणजे पॅकेजिंगवर ब्रँडेड मसाल्यावर लिहिलेले अक्षर मोठे आणि डुप्लिकेट एव्हरेस्ट मटण मसाला आणि मॅगी मसाल्यामध्ये लिहिलेली अक्षरे लहान असल्यामुळे तुम्ही ब्रँडेड आणि डुप्लिकेटमध्ये फरक करू शकता.