आटपाडी : मापटेमळा येथे आई-वडीलांना नीट सांभाळा असे असे सांगणाऱ्या ‘बहिणीला’ भाव-भावजय कडून मारहाण

0
9

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील येथे आई-वडीलांना नीट सांभाळा असे असे सांगणाऱ्या ‘बहिणीला’ भावांनी मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी जयश्री दादा करचे (वय 55) रा. शेनवडी ता. माण, जि. सातारा या माहेरी मापटेमळा येथे दिनांक २२ रोजी आल्या होत्या. यावेळी त्यांनी आई-वडिलांना व्यवस्थित सांभाळा असे सांगत असताना आरोपी यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून कानशिलात मारून त्याचे वडील मुरलीधर गळवे, यांच्या हातातील काठीने डावे हाताचे कोपरावर मारून फ्रॅक्चर केला आहे.

आरोपी कृष्णदेव मुरलीधर गळवे याने हाताने मारहाण केली आहे आरोपी क्रमांक तीन उमेश्वर गिरजापा गळवे यानेहि शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे. तर आरोपी क्रमांक चार शेवंताबाई गिरजाप्पा गळवे हिने फिर्यादी शिवीगाळीकरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सदर घटनेबाबत फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here