2.75 कोटींची थकबाकी न दिल्याने 9 सदस्यांनी विष प्राशन करून केला सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

0
310

गुजरातमधून पून्हा सामूहिक आत्महत्येची घटना समोर आली आहे. कोट्यावधींची थकीत रक्कम न दिल्याने दिवाळखोरीच्या भितीपोटी व्यापारी कुटुंबाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. सुदैवाने यात सर्व बचावले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकोटच्या केवडवाडी भागातून ही घटना समोर आली आहे. सोनी कुटुंबातील नऊ जणांनी शनिवारी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंबईतील व्यापाऱ्यांनी पुरवलेल्या 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 2.75 कोटी रुपये न दिल्याने व्यवसायाने ज्वेलर्स असलेल्या सोनी कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे अहवालात म्हटले आहे.

गेल्या 11 महिन्यांपासून सोनी कुटुंबाचा मानसिक छळ सुरू होता. मुंबईतील व्यापाऱ्यांना वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नव्हते. व्यापाऱ्यांनी थकबाकी भरण्यात अपयशी ठरल्याने, शिवाय कुटुंबाला मिळणाऱ्या धमक्यांमुळे सोनी कुटुंबीयांनी हे टोकाचे पाऊल उचलले. सध्या पोलिस सर्व जणांचे स्टेटमेंट रेकॉर्ज करत आहेत. विजय कैलासजी रावल, प्रशांत, महेंद्र अशी आरोपींची नावे आहेत. त्याशिवाय, इतर चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

2023 मध्ये अशाच एका प्रकरणात, तीन मुलांसह एका कुटुंबातील सात जणांनी सुरतमधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये सामूहीक आत्महत्या केली होती. त्या कुटुंबानेही आर्थिक संकटाचा सामना करत नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलले होते. सर्व मृतदेह सडून गेल्याने घरातून दुर्गंधी सुटल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले होते. दरम्यान, राजकोटच्या केवडवाडी भागात घडलेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेत कंत्राटदार, त्याची पत्नी, त्याचे पालक आणि या जोडप्याची तीन मुले, एक सहा वर्षांचा मुलगा आणि 10 आणि 13 वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here