सहकर्मचाऱ्यांच्या सततच्या छळामुळे बॅंकेत Executive पदावरील महिलेने विष पिऊन संपवलं आयुष्य

0
242

नोएडा मध्ये 12 जुलै दिवशी एका अॅaक्सेस बॅंक कर्मचारी महिलेने आत्महत्या करून जीवन संपावल्याची घटना समोर आली आहे. टर्मिनेशन लेटर मिळाल्यानंतर तिने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. दरम्यान सुसाईड नोट मध्ये या महिलेने सहकर्मचार्यांलवर छळल्याचा आरोप केला आहे. आपल्याला ‘घटस्फोटित’ आणि ‘बंदरिया’ म्हणून हिणवलं जात असल्याचं म्हटलं आहे. तिने सहा जणांचा उल्लेख केला आहे तर यामध्ये 2 सेल्स मॅनेजर आहेत. सध्या पोलिस या प्रकरणामध्ये तपास करत आहेत.

Times of India,च्या रिपोर्टनुसार 27 वर्षीय शिवानी गुप्ताने नुकतीच बॅंकेमध्ये रिलेशनशीप ऑफिसर म्हणून नोकरी मिळवली होती. नोएडा मध्ये सेक्टर 128 मध्ये ती कामाला जात होती. 12 जुलैला 4 च्या सुमारास तिला टर्मिनेशन लेटर मिळाल्यानंतर दोन तासांतच तिने स्वतःला एका खोलित कोंडलं आणि विष पिऊन आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी तिने 5 पानी सुसाईड नोट लिहली आहे.

सुसाईड नोट मध्ये ऑफिस मधील सहकर्मचार्यां ची नावं आहेत. मागील सहा महिने तिला होत असलेल्या कर्मचार्यांमच्या वागणूकीमुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने एका महिला सहकाऱ्याला तिचा मुख्य त्रास देणारी म्हणून म्हटलं आहे. ती अनेकदा क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालत असे आणि तिला “बंदरिया” किंवा ‘वेडी’ अशी संबोधत होती असे चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. तसेच मानसिक तणावामुळे तिचे हात थरथर कापत असताना सहकाऱ्यांनी तिची चेष्टा केल्याचंही तिने म्हटलं आहे.

शिवानीने या वागणुकीची अनेक वेळा तिच्या सेल्स मॅनेजर आणि एरिया सेल्स मॅनेजरला तक्रार केली, पण त्यांनी तिला मदत करण्याऐवजी तिच्यावरच आरोप केले. एका प्रसंगी, जेव्हा तिने तिच्या व्यवस्थापकांनी तिच्या सहकाऱ्यांवर कारवाई करण्याचा आग्रह धरला तेव्हा तिला राजीनामा देऊन घरी जाण्यास सांगण्यात आले. असं तिने म्हटलं आहे.

Axis Bank च्या प्रवक्त्यांकडून या प्रकरणी शोक व्यक्त करण्यात आला आहे. सेक्टर 128 मधील आपल्या शाखेत आपण प्रायव्हेट एजंसीच्या माध्यमातून कर्मचार्यां ची नेमणूक केल्याचं म्हटलं आहे. अॅवक्सिस बॅंकेमध्ये आम्ही कामाच्या ठिकाणी छळवादाचा निषेध करतो. अशा प्रकाराला आमचे समर्थन नसेल.