धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही; सुरेश धस यांनी केले स्पष्ट

0
222

बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. तसेच सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली.

 

किशोर फड, संगीत दिघोळे यांच्या मातोश्रींना आणि त्यांच्या पत्नींना भेटायला परळीला जाणार आहे. पाच वर्ष बीड जिल्ह्यांत काय चालले आहे ते सगळ्यांना माहिती आहे. धनंजय मुंडे यांना सगळे माहिती आहे. आकांना त्यांच्या आकांनी पाठिंबाच दिला आहे, अशी टीका सुरेश धस यांनी केली.

 

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश सोळंकी यांनी राजीनाम्याची मागणी केली. मी आका आणि आकाचे आका म्हणत होतो. आका म्हणजे वाल्मीक कराड सगळ्या प्रकरणांत आहे. वाल्मीक कराडची चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा किंवा काय करायचे हे देवगिरीवर राहणाऱ्या अजित पवारांच्या हातात आहे, असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.