
माणदेश एक्सप्रेस/बीड : बीड पोलिस मधील निलंबित अधिकारी रणजीत कासले यांनी गेल्या काही दिवसापासून वेगवेगळे दावे केले आहेत. काल त्यांनी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती असा दावा केला होता. दरम्यान, आता या दाव्यावरुनच एक गौप्यस्फोट केला आहे. वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची सुपारी धनंजय मुंडे यांनीच दिली होती, असा गौप्यस्फोट कासले यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरचा प्रयत्न केल्याचा दावा कासले यांनी केला. तसेच पोलिसांनी आपल्याला पकडून दाखवावे असं आवाहनही त्यांनी दिले. कासले यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, काल मी वाल्मीक कराड याच्या संदर्भात मी माझ मत मांडलं. तर काल माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला, मी काल मुलाखतीमध्ये सांगितले की काहीतरी लपवण्यासाठी हे केलं. एन्काऊंटर कुणी करण्यासाठी ऑफर दिली होती, त्यांच मी आज नाव सांगतो. ते म्हणजे धनंजय मुंडे आहेत. कारण धनंजय मुंडे यांची सर्व माहिती त्यांना माहिती होती. वाल्मीक कराड सर्व बाहेर काढणार होते, असा मोठा गौप्यस्फोट रणजित कासले यांनी केला.
“मुंडेंना आरोप केले जाणार नाही, कारण सर्व पुरावे दाबले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे. महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावे. मी त्यांना ओपन चॅलेंज देतो. त्यांनी कितीही टीम पाठवू द्या. मी रोज स्टेट बदलणार, सीम कार्ड बदलणार, असंही कासले म्हणाले.