सांगलीत जलतरणपटूवर मगरीचा हल्ला

0
178

माणदेश एक्सप्रेस/सांगली : सांगलीतील कृष्णाकाठच्या माईघाटावर पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या जलतरणपटूवर सोमवारी मगरीने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कृष्णाकाठ पुन्हा एकदा धास्तावला आहे.

 

 

याबाबत माहिती अशी – कृष्णा जलतरण क्लबचे शरद जाधव हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी माई घाटाजवळ पोहण्यासाठी नदीत उतरले होते. पोहत असताना सांगलीवाडीच्या बाजूला जाधव यांच्यावर मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांचा उजवा पाय जबड्यात धरला होता. जाधव यांनी ताकदीने मगरीच्या जबड्यातून आपला पाय सोडवून घेत नदीचा काठ गाठला. या वेळी त्यांच्यासमवेत आणखी काही तरुण पोहण्यासाठी नदीत उतरले होते. त्यांनी जाधव यांना उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here