‘पडळकर बंधू’नी खानापूर विधानसभा लढवण्याची मागणी : कार्यकर्ते सक्रिय : खानापूर तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात उत्तम प्रतिसाद

0
25

माणदेश न्यूज नेटवर्क/ आटपाडी/प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये खानापूर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर किंवा समाज कल्याणचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी लढवण्याची मागणी कार्यकर्त्यांतुन व्यक्त केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या या मागणीला संपूर्ण खानापूर विधानसभा मतदार संघातून पडळकर बंधूंना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

 

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेध लागले आहेत. दरम्यान संपूर्ण खानापूर मतदारसंघात पडळकर बंधूंना मानणारा मोठा मतदार निर्माण झाला आहे. तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कल, विटा शहर व खानापूर तालुक्यामध्ये गेल्या पाच ते सात वर्षांपासून आमदार गोपीचंद पडळकर व ब्रम्हानंद पडळकर यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत.

 

याच बरोबर सर्वसामान्य जनतेला पडळकर बंधूनी आपलेसे करण्यात यश मिळविले आहे. खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावाचा त्यांनी संपर्क दौरा केला असून या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांना विविध घटकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.

 

सध्या लोकसभा निवडणुका झाल्या असून आता पुलाखालून पाणी वाहून गेले आहे. त्यातच लोकसभेला भाजपला विचार करायला लावणारा निकाल असल्याने, कार्यकर्त्यांची इच्छा ही भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी अशीच आहे. जर विधानसभेला महायुतीचे जागा वाटप जुळले नाही तर प्रत्येक राजकीय पक्ष आपापले उमेदवार निवडणुकीमध्ये उभे करण्याची शक्यता नाकरता येत नाही.

 

भाजपला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला दगाफटका त्यामुळे भाजपकडून सध्या तरी, मतदार संघनिहाय सर्व्हे चालू केला आहे. त्यामुळे विधानसभेला विजयी उमेदवार हा जर निकष भाजपने लावला तर, खानापूर मतदार संघातून विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर व माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब होवू शकते.

 

त्यामुळे सध्या कार्यकर्त्याकडून विधानसभा लढविण्यासाठी गोपीचंद पडळकर व ब्रम्हदेव पडळकर यांच्यावरती दबाव वाढू लागला असल्याने गोपीचंद पडळकर व ब्रम्हदेव पडळकर यांना निर्णय घ्यावा लागणार असून पडळकर बंधू खानापूर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून सांगितले जात आहे.