बेबी केअर सेंटरला भीषण आग, सहा नवजात बालकांचा मृत्यू,सहा गंभीर

0
3

 

अधिका-यांनी सांगितले की इमारतीतून 12 नवजात बालकांची सुटका करण्यात आली मात्र सहा जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्हेंटिलेटरवर असलेल्या इतर सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही गंभीर आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11.32 च्या सुमारास दिल्लीतील शाहदरा भागातील विवेक विहारच्या IIT ब्लॉक बी येथे असलेल्या बेबी केअर सेंटरमध्ये आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बाल संगोपन केंद्रात मुले व कर्मचारी उपस्थित होते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि नवजात बालकांना वाचवण्यास सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत सर्वांची सुटका करण्यात आली. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सहा नवजात बालकांचा मृत्यू झाला.

तळमजल्यासह तीन मजली इमारत आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. इमारतीबाहेर उभी असलेली एक व्हॅनही पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी गोंधळ सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली.

शाहदरा जिल्ह्यातील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला आग लागल्याचे समजताच इमारतीच्या मागील खिडक्या तोडून नवजात बालकांना बाहेर काढण्यात आले, रुग्णालयाबाहेर नातेवाईकांची गर्दी. आरडाओरडा होत असताना स्थानिक लोक मदतीसाठी धावले. काही वेळातच आगीने वरच्या मजल्याला वेढले, पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या लोकांनी इमारतीच्या मागील बाजूच्या खिडक्या तोडल्या आणि नवजात बालकांना एक एक करून बाहेर काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here