कचराकुंडीमध्ये मिळाले प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले मृत अर्भक; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0
3

पुण्यात नवजात अर्भक कचराकुंडीमध्ये मृतावस्थेत आढळून आले. विमान नगर(Viman Nagar) परिसरातून काल सोमवारी ही घटना उघडकीस आली. सफाई कर्मचारी सुशीला साळवे (वय 50, रा. इंदिरा नगर) या सकाळी 6.30 च्या सुमारास जेपी नगरमध्ये सफाई करत असताना हा प्रकार उघडकीस आला. हे मृत अर्भक(Dead Infant) मुलाचे होते. ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून कचराकुंडीत फेकण्यात आले होते. साळवे यांनी या घटनेची माहिती विमानतळ पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३१८ (मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावून जन्म लपवून ठेवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here