वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही लेकीची संयमी प्रतिक्रिया…

0
253

माणदेश एक्सप्रेस/बारामती : शिर्डी भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हजेरी लावून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर तोफ डागली. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे.

 

“१९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडलं होतं. दगाफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली”, असं अमित शाह म्हणाले होते.

 

अमित शाहांच्या या टीकेवर सुप्रिया सुळेंनी पलटवार केला आहे. “एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावं लागतंय. त्यांनी जरूर टीका करावी. पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त दोन शब्द सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा आधार मिळाला असता.”छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इथे खून, बलात्कार, अन्याय, अत्याचार असं सगळं होत असताना गप्प बसायचं का? ” असा सवालही यावेळी सुप्रिया सुळेंनी केला.