रस्त्यावर वाहने लावणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल

0
442

माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये आठवडी बाजारामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहने लावून त्यामधून मालाची विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्या विरुद्ध आटपाडी पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.

 

नितीन दिगंबर बाबर वय 34, रा चोपडी, ता.सांगोला, जि. सोलापुर व शाकीर सत्तार बागबान वय 32, रा.पंढरपुर, ता.पंढरपुर जि. सोलापुर अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत आटपाडी पोलिसात कॉन्स्टेबल सतिशकुमार सुंदरसिंह जाधव व प्रविण रामचंद्र गडदरे यांनी फिर्यादी दिली आहे.

 

 

शनिवारी आटपाडी येथे आठवडी बाजार असतो.या दिवशी तालुक्याबाहेरील व्यापारी हे आपला विक्री करण्यासाठी आटपाडी येथे असतात.परंतु व्यापाऱ्यांनी वाहतुकीला अडथळा येईल अशी वाहने लावून माल विक्री करत होते. यामुळे बाजारपटांगणमधीलपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे सदर व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here