
माणदेश एक्सप्रेस न्युज
कोल्हापूर : गोकुळच्या वतीने गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्यात येत असून याची अंमलबजावणी आज मंगळवार, दि. 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केली.
दूध पावडर व बटरचे दर वाढल्यामुळे गाय दूध खरेदी दर वाढविण्यात येत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. काही महिन्यापूर्वी गोकुळने केवळ म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ केली होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करून गोकुळने गाय दूध उत्पादकांना पाडव्याची भेट दिली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील गाय दूध उत्पादक शेतकर्यांधमधून समाधान व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे गाय दूध उत्पादकांना चार कोटी 80 लाख रुपये जादा मिळणार आहेत. सध्या गाईचा दूध खरेदी दर 30 रुपये प्रतिलिटर होता, तो आता 32 रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे.