राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा अपघात, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय…

0
672

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान  यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी समीर खान यांच्या पत्नी आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर या देखील सोबत होत्या. त्यांच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नेमका कसा घडला अपघात?
समीर खान आणि त्यांची पत्नी हे दोघे त्यांच्या घराजवळ असणाऱ्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर दोघेही बाहेर आले होते. यानंतर समीर यांनी ड्रायव्रला गाडी घेऊन येण्यास सांगितले. यावेळी ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटर पाय पडला आणि गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान गे मल्टिफॅक्टर झाले आहेत. काही वेळापूर्वी त्यांचे ऑपरेशन देखील पार पडले आहे. सध्या समीर आयसीयूमध्ये असून आणखी काही काळ अंडर ऑफजवेशन मध्ये ठेवलं जाईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here