
आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे केस गळणे, कोरडेपणा आणि फ्रिझी केस यांसारख्या समस्यांनी सर्वसामान्य त्रस्त आहेत. अशा वेळी केसांची योग्य निगा राखण्यासाठी शॅम्पूइतकंच कंडिशनर आणि सीरम वापरणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. मात्र या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे, हे अनेकांना माहिती नसतं.
कंडिशनर हे शॅम्पूनंतर वापरलं जाणारं केसांना मऊपणा देणारं आणि ओलावा टिकवून ठेवणारं उत्पादन आहे. याच्या वापरामुळे केस गुळगुळीत होतात, गुंतणे कमी होते आणि केसांवर एक सुरक्षात्मक थर तयार होतो.
तर दुसरीकडे, सीरम हे केस धुतल्यावर आणि सुकवल्यावर लावले जाणारे हलकं, तेलकट किंवा जेलसारखं उत्पादन आहे. हे केसांमध्ये चमक आणतं, फ्रिझ कमी करतं आणि स्टायलिंग दरम्यान उष्णतेपासून केसांचं संरक्षण करतं. सीरम विशेषतः कोरडे, निर्जीव केस असलेल्या व्यक्तींना अधिक फायदेशीर ठरतं.
विशेष म्हणजे, कंडिशनर हे केसांच्या मधल्या भागांपासून टोकांपर्यंत लावलं जातं आणि नंतर धुवून टाकावं लागतं, तर सीरम हे मुख्यतः केसांच्या टोकांवर लावून तसेच ठेवले जातं.
केसांची योग्य निगा राखण्यासाठी या दोन्ही प्रॉडक्ट्सचा योग्य प्रकारे वापर करणं अत्यावश्यक आहे. मात्र कोणतंही प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही उत्तम, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती सामान्य स्रोतांवर आधारित असून, कोणतीही कृती करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.)