महाराष्ट्रताज्या बातम्याराजकारण

‘चोट्या, तुझ्यावर एक तरी केस आहे का’; गुलाबराव पाटलांचा कोणाला टोला?

 

राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान होईल. त्यापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांच्या शब्दांना धार चढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या पण टप्प्यात राज्यात डेरेदाखल आहेत. त्यामुळे एकमेकांवरील हल्ले वाढले आहेत. मुंबईपासून ते नाशिकपर्यंतचा गड खेचून आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात हा निकाराचा लढा सुरु आहे. त्यातच खानदेशची मुलूखमैदान तोफ गुलाबराव पाटील यांनी पु्न्हा उद्धव ठाकरे गटाचा समाचार घेतला आहे. शेरोशायरी करत त्यांनी पुन्हा एकदा शालीतून जोडे हाणले आहेत.

गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उध्दव ठाकरे आता पंजाला मत देणार आहेत, ज्या काँग्रेस सरकारने आमच्यावर, शिवसैनिकांवर केसेस टाकल्या. त्यांना ते मतदान करणार आहेत. बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल, असा सवाल त्यांनी केला. आमचा मुख्यमंत्री साधा आहे, रिक्षावाला आहे. गरीबावाला मुख्यमंत्री झालेला यांना पटतं नाही. बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांनी जे काम त्यांनी केलं नाही ते केलं. ग्रामपंचायतीत सुध्दा सरपंचचा उमेदवार लागतो,आमच्याकडे टॉप टू बॉटम एकच उमेदवार आहे. आमच्याकडे नरेंद्र दामोदरदास मोदी आहेत. ‘गद्दारों कें लिए कहर है मोदी’, असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊतांवर जहरी टीका

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे गट, संजय राऊत सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करत आहे. त्यांना चोर म्हणत आहे. पक्ष चोरीचा, दरोडा घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी नुकताच केला होता. त्याला गुलाबराव पाटील यांनी खानदेशमधील सभेतून उत्तर दिले.’आयुष्यात शिवसेना तुला माहिती आहे का चोट्या तुझ्यावर एक तरी केस आहे का?’ अशी जहरी टीका त्यांनी राऊतांवर केली. बाळासाहेब म्हणायचे ज्यांच्यावर केस नाहीत तो शिवसैनीक नाही, असा टोला ही त्यांनी राऊत यांना लगावला.

यापूर्वी खानदेशीमधील सभांमध्ये संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. पान टपरीवर बसून नाही तर 24 तास जनतेची सेवा केली म्हणून आमदार झालो, तू काय केलं? असा निशाणा गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर साधला होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button