‘या’ पाच महाराष्ट्रीय मंत्र्यांना मिळू शकते नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये संधी ?

0
5

भाजप (BJP) प्रणित एनडीए (NDA) केंद्रामध्ये सत्ता स्थापन करत आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) या सरकारचे पंतप्रधान म्हणून प्रमुख असतील. त्यांचा शपथविधी आज (रविवार, 9 जून) सायंकाळी होऊ घातला आहे. दरम्यान, त्यांच्या मंत्रिमंडळात कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी असेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. दरम्यान, सायंकाळच्या सोहळ्यात मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी काही खासदारांना फोन आल्याचे समजते. यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश आहे. आतार्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी (Nitin Gadkari), रक्षा खडसे (Raksha Khadse), रामदास आठवले (Ramdas Athawale), प्रताप जाधव (Prataprao Jadhav) आदी नेत्यांना फोन आल्याचे समजते.

काही केंद्रीय मंत्र्यांना फोन नाही
महाराष्ट्रातील कोणते चेहरे केंद्रात सत्तेमध्ये असतील याबाबत मोठी उत्सुकता आहे. खास करुन नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आगोदर मंत्री असलेल्या काही नेत्यांना फोन आले नसल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे जुन्या चेहऱ्यांना संधी मिळणार की या वेळी मोदी सरकारमध्ये नव्यांना जबाबदारी दिली जाणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (हेही वाचा, Narendra Modi Swearing-in Ceremony: नरेंद्र मोदींनी शपथविधीपूर्वी वाहिली महात्मा गांधी, वाजपेयी यांना आदरांजली)

मंत्रिपदासाठी केंद्रातून फोन आलेले महाराष्ट्रातील कथीत नेते
नितीन गडकरी (भाजप, पूर्व केंद्रीय मंत्री)
पियुष गोयल (भाजप, पूर्व केंद्रीय मंत्री)
रामदास आठवले (रिपाई (आठवले गट), पूर्व केंद्रीय मंत्री)
रक्षा खडसे (भाजप)
प्रताप जाधव (शिवसेना)
दरम्यान, महाराष्ट्रासोबतच देशातील इतर कोणते नेते, खासदारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल याबाबतही स्पर्धा सुरु आहे. प्राप्त माहितनुसार, TDP, LJP (R) आणि JDU या एनडीएतील प्रमुख पक्षांच्या खासदारांनाही फोन आल्याची चर्चा आहे. ज्यामध्ये टीडीपी खासदार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी आणि किंजरापू राम मोहन नायडू, राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल NDA मध्ये चर्चा

भारतीय जनता पक्षाला सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये अपेक्षीत यश मिळाले नाही. भारतीय जनतेने भाजपला बहुमतापासून दूर ठेवले. परिणामी केंद्रात सत्ता स्थापन करायची तर भाजपला पर्यायाने नरेंद्र मोदी यांनी JD(U), TDP यांसारख्या पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. हे पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाचा समावेस असावा याबाबत एनडीएतील नेत्यांची प्रमुख बैठक दिल्ली येथे पार पडली. याबैठकीला नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, नीतीश कुमार, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे, अजित पवार यांसारखी मंडळी उपस्थित होती.

दरम्यान, लोकसभेत केवळ एक जागा असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार किंवा नाही याबातब अद्याप कोणतीच माहिती पुढे आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अद्याप तरी फोन आल्याचे वृत्त नाही. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खलबतं सुरु असल्याचे समजते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here