गुन्हेताज्या बातम्या

कोलकातामध्ये खासदाराची निर्घृण हत्या ; मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजरमध्ये ठेवले

कोलकाता पोलिसांचे म्हणणे आहे की 13 मे रोजी बांगलादेश अवामी लीगचे खासदार अन्वारुल अझीम यांची त्यांच्या न्यूटाऊन फ्लॅटमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती, आरोपींनी मृतदेह कुजण्यापासून वाचवण्यासाठी त्याचे अनेक तुकडे केले. यानंतर, ते तुकडे एका फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 14 मे, 15 मे आणि 18 मे असे तीन दिवस खासदाराच्या शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. या कामासाठी दोन जणांना काम देण्यात आले होते. मात्र, मृतदेहाचे तुकडे कोठे फेकले याचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही.

तीन हल्लेखोरांना अटक
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी बुधवारी (22 मे 2024) सांगितले की, बांगलादेश पोलिसांनी या संदर्भात तीन जणांना अटक केली आहे. यात सहभागी सर्व मारेकरी बांगलादेशी असल्याचे आतापर्यंत आम्हाला समजले आहे. ही नियोजित हत्या होती. हत्येचे कारण लवकरच सांगू. भारतीय पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत.

अन्वारुल अझीम तीन वेळा खासदार
बांगलादेशच्या संसदेच्या वेबसाइटनुसार, अन्वारुल अझीम बांगलादेश अवामी लीगचा सदस्य होते. ते तीन वेळा खासदार होते. अझीम खुलना विभागातील मधुगंज येथील रहिवासी होते. खासदार असण्यासोबतच व्यापारी आणि शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती. ते झेनैदह-4 चे खासदार होते. अन्वारुल अझीम पश्चिम बंगालमध्ये उपचारासाठी आले होते. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पूर्वनियोजित हत्या आहे. मात्र, नवारुल अझीम यांच्या हत्येमागची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button