ब्रेकिंग : VIdeo : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक अटकेत ; अटकेनंतर म्हणाले, मोदी साहेब कांद्यावर बोलावंच लागेल..

0
16

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : राज्यात लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडत आहे. महायुती व महाआघाडी कडून राज्यात जोरदार प्रचार सुरु असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दोन्ही कडून उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक यांच्यामुळे प्रचारात रंगत येत असून, सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक यशवंत गोसावी यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून यामुळे वातावरण सध्या गरम झाले आहे. नाशिक जिल्ह्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत असून यामुळे तर यशवंत गोसावी यांना अटक केली आहे? हे मात्र समजू शकले नाही.

मात्र नाशिक पोलिसांनी यशवंत गोसावी यांना अटक केल्या नंतर मात्र यशवंत गोसावी आक्रमक खळे असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, मला अटक केली असली तरी, नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नावर ‘मोदी साहेब कांद्यावर बोलावंच लागेल’ याची आठवण करून देत एकप्रकारे त्यांच्यावर टीका केली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here