खानापूर विधानसभा मतदारसंघात आता “ब्रम्हा”नंदच

0
877

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आटपाडी तालुक्याचे युवा नेते समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांना जनतेतून मोठा पाठिंबा मिळत असून बहुजन नेतृत्वाला संधी देण्याचा निर्धार जनतेतून व्यक्त केला जात आहे. म्हणूनच आता खानापूर विधानसभा मतदारसंघात फक्त “ब्रम्हा”नंद अशी हाक जनतेने दिली आहे.

 

खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार म्हणून आता जनतेला आपल्या हक्काचे नेतृत्व हव आहे. गेल्या अनेक वर्ष पिचलेल्या बहुजन समाजाला स्वाभिमान मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी नेतृत्व म्हणून ब्रम्हानंद पडळकर यांच्याकडे जनता पाहत आहे. गेल्या दोन वर्षापासून ब्रम्हानंद पडळकर यांनी खानापूर तालुका, विटा शहर व विटा भागातील ग्रामीण गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून विकास निधी दिला आहे. याचबरोबर या गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये सामील होत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा ब्रम्हानंद पडळकर यांनी प्रयत्न केला आहे. म्हणूनच सर्वसामान्य जनतेला गावगाड्यातील आठरा पगड समाजातील वंचित, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त घटकांना ब्रम्हानंद पडळकर हे आपलेसे वाटू लागले आहेत.

 

गेले अनेक तपांचा राजकीय काळ पाहता आमदार गोपीचंद पडळकर व माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी राजकीय संघर्ष करत गावगाड्यात विकासाची गंगा पोहोचवली. गावगाड्यातील सर्वसामान्य नागरिकांना स्वाभिमान मिळवून दिला. बहुजन समाजाचे नेतृत्व विधानसभेमध्ये गेल्यास बहुजन समाजाला चांगला न्याय मिळेल हाच संदेश आता संपूर्ण मतदारसंघात जनतेने दिला आहे, गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे आमदार असताना त्यांनी बहुजन समाजाच्या विविध प्रश्नाबाबत सरकार दरबारी पाठपुरावा केला. विधानसभेमध्ये आपला हक्काचा माणूस पाठवण्यासाठी बहुजन समाजातील जनता जागृत झाली आहे. त्यांनी ब्रम्हानंद पडळकर यांच्या पाठीशी मोठी ताकद निर्माण केली असून यंदा काही जरी झाले तरी आमदार म्हणून ब्रम्हानंद पडळकर यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार जनतेने व्यक्त केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here