भाजप पदाधिकारी- जिल्हाधिकारी स्ट्रँग रुममध्ये फिरताय ; माजी खासदाराच्या आरोपाने खळबळ

0
1

माणदेश एक्सप्रेस न्युज/ जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघ आणि रावेर लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान झाले होते. त्यानंतर दोन्ही लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम वखार महामंडळाच्या स्ट्राँग रुममध्ये ठेवले आहे. 26 मे रोजी सकाळी 9 वाजेपासून 9.04 मिनिटांपर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाला होता.

त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी जिल्हाधिकारींना ही बाब सांगितली. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डिस्प्ले बंद झाला, असे जिल्हाधिकारींनी म्हटले होते.

उन्मेष पाटील यांचा खळबळजनक आरोप
जळगावातील मतदानाचे मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमरूम मधील सीसीटीव्ही फुटेज डिस्प्ले बंदच्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. शिवसेना ठाकरे गटातील माजी खासदार उन्मेष पाटील यांनी ही माहिती दिली. जनरेटरचा आणि इन्वर्टरचा बॅकअप असताना डिस्प्ले बंद होत असतील तर ही संशयास्पद बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत भाजपचे पदाधिकारी स्ट्राँग रूममध्ये फिरत असल्याचा आरोप माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. त्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर संशय व्यक्त केला आहे. उन्मेष पाटील यांच्या या आरोपामुळे सध्या राजकीय वातावरण तापले असून, भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here