पुण्यात मनसेला मोठा धक्का! शहर उपाध्यक्ष संदीप मोहिते पाटलांचा शिवसेनेत प्रवेश

0
70

माणदेश एक्सप्रेस/पुणे: गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जोरदार इनकमिंग पाहायला मिळत असून, आता पुणे शहरातील मनसेला मोठा धक्का बसला आहे. पुणे शहर मनसेचे उपाध्यक्ष संदीप मोहिते पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काल शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

 

हेमंत बत्ते, हिंदू युवा प्रबोधनीचे अध्यक्ष राजाभाऊ बेंद्रे, नितीन पायगुडे, प्रतीक सदाशिवराव मोहिते पाटील, रणजित ढगे पाटील, अभीषेक जगताप, विशाल पवार यांच्यासह संदीप मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगवा हातात घेतला आणि “भगवा आम्हाला प्राणप्रिय आहे” असा ठाम संदेश दिला.

 

एकेकाळी मनसेच्या माध्यमातून संपूर्ण पुण्यात ठसा उमटवणारे आणि संघटनात्मक बांधणीत पारंगत असलेले संदीप मोहिते पाटील यांच्या या निर्णयाने पुण्यातील सायलंट वोटर्समध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळात होणाऱ्या बहुप्रतिक्षित पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या नवीन नेतृत्वामुळे पुण्यातील शिवसेनेला नवचैतन्य प्राप्त होणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here