सावधान! देशात मेंदू खाणाऱ्या अमिबाचा संसर्ग वाढला , आतापर्यंत 22 जण मृत्युमुखी

0
200

केरळमधील कोझिकोडमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला. मृदुल नावाचा हा मुलगा एका छोट्या तलावात आंघोळीसाठी गेला त्यानंतर त्याला संसर्ग झाला. हा रोग अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस (पीएएम) म्हणून ओळखला जातो, जो नायगलेरिया फॉवलेरी नावाच्या अमीबामुळे होतो. जेव्हा हा अमिबा पाण्याद्वारे शरीरात पोहोचतो, तेव्हा अवघ्या चार दिवसांत तो मानवी मज्जासंस्थेवर म्हणजेच मेंदूवर हल्ला करू लागतो.

14 दिवसांच्या आत मेंदूला सूज येते ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. या वर्षात केरळमध्ये या आजाराने झालेला हा तिसरा मृत्यू आहे. मात्र, याआधीही देशातील विविध रुग्णालयांमध्ये अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिस आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्र सरकारच्या एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) नुसार, केरळपासून हरियाणा आणि चंदीगडमध्ये आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 2021 नंतर सहा मृत्यूंची नोंद झाली आहे. केरळमध्ये 2016 मध्ये पहिले प्रकरण समोर आले होते. तेव्हापासून येथे आठ रुग्ण सापडले असून सर्वांचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीस्थित इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, 2019 पर्यंत देशात या आजाराची 17 प्रकरणे नोंदवली गेली होती, परंतु कोरोना महामारीनंतर अनेक प्रकारच्या संसर्गामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हा आजार अचानक वाढण्यामागे हे कारण असू शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here