जादूटोणा केल्याच्या संशयामधून जोडप्याला मारहाण; 8 जणांविरूद्ध गुन्हा दाखल

0
4

 

यवतमाळच्या बाभूळगाव मधील यावली इथे जादूटोणा केल्याच्या संशयामधून एका जोडप्याला गावामधील काही लोकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एकाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणामध्ये बाभूळगाव पोलिसांनी 8 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बाभूळगाव तालुक्यातील यावली इथे काहींना अपत्यप्राप्ती होत नसल्याने गावातील प्रमोद वाकोडे आणि त्याच्या पत्नीनं जादुटोणा केला, असा संशय धरूनच गावातीलच काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रज्वल ठाकरे सह 8 जणांनी प्रमोदच्या घरी जाऊन त्याला आणि त्याच्या पत्नीला मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. सध्या शासकीय रूग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

जखमी प्रमोद वाकोडे यांनी बाभूळगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून जादूटोणा केल्याच्या संशयावरून मारहाण केल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणात बाभूळगाव पोलिसांनी 8 आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here