मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एक मोठी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चैन्नईहून नवी दिल्लीच्या दिशेने जात असताना, सुरक्षा मालवाहू ट्रकमधून १५०० पेक्षा अधिक आयफोन चोरीला गेले आहे. या चोरीला गेलेल्या फोनची किंमत सुमारे १५ कोटी इतकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक नवी दिल्लीला जात होता. १५ ऑगस्ट रोजी लखनादौन-झाशी हायवेवर पोहचला. कंटनेर ड्रायव्हरसह एक सुरक्षारक्षकही सोबत होता. लखनादौन येथे दुसरा सुरक्षारक्षक कंटेनरमध्ये येणार होता. लखनौदान येथे कंटेनरमध्ये असणाऱ्या सुरक्षारक्षकाने चहा पिण्यासाठी कंटेनर थांबवला. त्यावेली त्याने आधीच उपस्थिथ एका व्यक्तीची चालकाशी भेट करून दिली. हा सुरक्षारक्षक असून आपल्यासोबत येईल असं सांगितलं.
यानंतर दोन्ही सुरक्षारक्षकांसोबत ट्रक ड्रायव्हर रवाना झाला. ट्रक ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे त्यांनी गाडी रस्त्याशेजारी उभी केली. तिथेच तिघेजण झोपले. दुसऱ्या दिवशी ड्रायव्हरला जाग आल्यानंतर तो बांदरी येथे होता. त्याचे हात आणि पाय बांधलेले होते. स्वत:ची सुटका करून त्यांने कंटनेरचा गेट उघडला. तर त्यावेळी सर्व मोबाईल फोन गायब होते. कंटनेरमधील दोन्ही सुरक्षारक्षकही बेपत्ता होते. ट्रकमधून जवळपास अर्धाहून फोन चोरीला गेल्याचे समजले.
चालकाने बांदरी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण पोलिसांनी त्यावेळी लक्ष दिले नाही. १५ दिवसांनंतर पोलिस महानिरिक्षक प्रमोद वर्मा यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते बांदरी पोलिस ठाण्यात पोहोचले. या घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्यांनी बेजबाबदापणे बागणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले.
तक्रार दाखल केल्यानंतर सागर रेंजचे आयजी प्रमोद वर्मा यांनी सांगितले की, जवळपास १५०० पेक्षा अधिक मोबाईल चोरी झाली. पोलिसांनी ५ पथक नेमले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले आहे. या पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.