बँकेत नोकरी! परीक्षा न देता थेट बँकेत मॅनेजर, अर्ज कसा करायचा? फी किती?

0
780

 

प्रत्येकालाच एक स्थिर आणि चांगला पगार देणारी नोकरी हवी असते. बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्या या तुलनेने आरामदायी आणि चांगला पगार देणाऱ्या असतात, असे समजले जाते. आजही देशभरात लाखो तरुण बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्यासाठी परीक्षेची तयारी करतात. दरम्यान, IDBI Bank बँकेने मात्र कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट मॅनेजर या पदावर रुजू होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. IDBI बँकेकडून वेगवेगळ्या पदांसाठी एकूण 56 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी शैक्षणिक पत्राता काय असायला हवी? निवड प्रक्रिया कशी आहे? कोणकोणत्या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे? हे जाणून घेऊ या…

IDBI बँकेकडून असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आयडीबीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यासाठी अर्ज करता येईल. 15 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.

कोणकोणत्या पदासाठी भरती होणार?
असिस्टंट जनरल मॅनेजर – एकूण 25 पदं

मॅनेजर- ग्रेड बी- एकूण 31 जागा

नेमकी पात्रता काय?
या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी भारतीय सरकारकडून मान्यता असलेल्या विद्यापीठातून पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले असावे. अर्जदार हा कमीत कमी 28 तर जास्तीत जास्त 40 वर्षांचा असावा.
मॅनेजर या पदासाठी उमदेवाराचे पदवीचपर्यंतचे शिक्षण झालेले असावे. उमेदवाराचे वय हे कमीत कमी 25 तर जास्तीत जास्त 35 वर्षे असावे.

निवड प्रक्रिया नेमकी कशी?
या दोन्ही पदांसाठी भरती राबवताना उमेदवाराचे वय, शिक्षण, कामाचा अनुभव या गोष्टी विचारात घेऊन चाळणी केली जाईल. सर्व अटी-शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची पुढील भरती प्रक्रियेसाठी निवड केली जाईल. त्यानंतर ग्रुप डिस्कशन, वैयक्तिक मुलाखत होईल. त्यानंतर योग्य आणि सर्वोत्कृष्ट उमेदवाराची निवड केली जाईल.

अर्ज करण्यासाठी फी काय?
या भरती प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर खुला प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गासाठी 1000 रुपये फी द्यावी लागेल. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये फी भरावी लागेल. ही फी ऑनालाईन पद्धतीने डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ट, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, मोबाईल वॉलेट्स या माध्यमातून द्यावी लागेल.

अर्ज नेमका कुठे करावा ?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा अशेल तर idbibank.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.