देशात उष्णतेची लाट उसळत असल्याने लोकांना उष्मघाताचा त्रास वाढत चालला आहे. अनेक राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढत होत आहे. नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. अशा भीषण परिस्थितीच झोमॅटो कंपनीने आपल्या ग्राहकांना दुपारी ऑर्डर देणे टाळण्याची विनंती केली आहे.
Zomato ने X वर पोस्ट शेअर केली आहे. त्यात असे लिहले आहे की, ”कृपया फार महत्त्वाचे असल्याशिवाय दुपारच्या वेळी ऑर्डर देणे टाळा,” काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेमुळे देशातील 15 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. लोक उष्माघातामुळे त्रस्त झाले आहे. झोमॅटो कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करत आणि डिलिव्हरी बॉईजना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे अपील केले आहे.