माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील आवळाई ग्रामपंचायत मध्ये प्रथमच तृतीयपंथीला उपसरपंच पदीची संधी मिळाली आहे. आवळाई ग्रामपंचायत मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी दिलीप हेगडे हे निवडून आले होते.
निवडणुकीनंतर लोकनियुक्त सरपंच पदी गजेंद्र पिसे हे निवडणुकीत विजयी झाले होते. सुरुवातीला उपसरपंच पदी राजश्री शेंडे यांची निवड करण्यात आली होती.
आटपाडी : लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत : “एवढ्या” दिवसांची पोलीस कोठडी
परंतु राजश्री शेंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर तृतीपंथी दिलीप हेगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आटपाडी तालुक्यातील दिलीप हेगडे हे प्रथमच तृतीयपंथी उपसरपंच म्हणून कारभार पाहणार आहेत.
या निवडी नंतर आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह भाजपचे युवा जिल्हाप्रमुख अनिल पाटील, भारत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.