भाजपा नेता आणि झारग्रामचे उमेदवार प्रणत टुडू यांच्यावर हल्ला

0
3

प्रणत टुडू यांनी दावा केला आहे की, पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील गरबेटा परिसरात आपल्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यांना वाचविताना त्यांचे सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

काही मतदान केंद्रांवर भाजपाच्या एजंटना प्रवेश नाकारल्याची तक्रारी आल्यानंतर प्रणत त्याची खातरजमा करण्यासाठी गारबेटा येथे जात होते. त्यानंतर टीएमसीच्या गुंडांनी माझ्या कारवर अचानक दगडफेक करायला सुरुवात केली आणि रस्ता संपूर्णपण ब्लॉक केला.