आटपाडी : गळवेवाडी येथील “त्या” मॉडेल स्कूल चे काम पोलीस बंदोबस्तात चालू

0
12

माणदेश एक्सप्रेस न्युज/आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथील मॉडेल स्कूलचे बांधकाम आज दिनांक २७ पासून पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले असल्याची माहिती सरपंच रघुनाथ गळवे यांनी दिली.

याबाबत माहिती देताना सरपंच रघुनाथ गळवे म्हणाले, मॉडेल स्कूल बांधकामा बाबत शिक्षक विजय गोडसे यांनी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर विटा येथे दावा दाखल केला होता. खरेदीपत्रापेक्षा जास्त जागा माझा असल्याबाबत हक्क दाखवत होते. मा. न्यायालयाने ग्रामपंचायतीच्या बाजूने आदेश देऊन देखील विजय गोडसे त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक अडवणूक करत होते.

याबाबत वारंवार काम बंद करण्यात आले होते. वरील लोकांवरती शासकीय कामात अडथळा आणले बाबत गुन्हा देखील नोंद आहे. परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून मॉडेल स्कूल बांधकाम सुरु करणेबाबत पाठपुरावा होता.शिक्षक विजय गोडसे जाणीवपूर्वक , दिवाणी न्यायालयाचा कोणताही बांधकाम थांबणेत यावे म्हणून स्टे नसताना बांधकाम थांबवत होते.

विजय गोडसे यांनी लगतचे मिळकत धारक चंद्रभागा सदाशिव गळवे व राजेंद्र तातोबा गळवे तसेच सुवर्णा रामचंद्र गळवे यांना शाळा बांधकाम आमच्या हद्दीत येत आहे म्हणून दावा दाखल करावयास लावला आहे. परंतु न्यायालयाने चंद्रभागा सदाशिव गळवे यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.

तसेच विजय गोडसे यांचा देखील खरेदी पत्राप्रमाणे जागा सोडून बांधकाम करावे यास परवानगी दिवाणी न्यायालयाने दिली आहे मात्र खरेदी पत्रापेक्षा जादा हक्क असल्याचा गोडसे यांचे म्हणणे असल्याने आज अखेर काम बंद ठेवले होते.

परंतु ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात काम चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. व आज पासून काम चालू केले असल्याचे सरपंच रघुनाथ गळवे यांनी सांगितले. यावेळी बाजार समिती संचालक शरदचंद्र काळेल, उपसरपंच दाजिराम गळवे, सर्व सदस्य कुंडलिक काळेल, विनायक काळेल, बापूराव गळवे, आप्पा घेरडे, गोरखनाथ गळवे, तुळशीराम पाटील, हणमंत गळवे, मच्छिंद्र गळवे, प्रकाश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.