
माणदेश एक्सप्रेस न्युज/ आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील दत्त मंदिर जवळ तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला. दोन चारचाकी व एक दुचाकी अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सदरचा अपघात हा आज दिनांक २८ रोजी सायंकाळी ७.०० च्या दरम्यान झाला.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, यातील एक चारचाकी व दुचाकीस्वार हे करगणी हून भिवघाटच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या गाड्या या दत्त मंदिर जवळ आल्या असत्या, सांगलीहून दिघंचीकडे निघालेल्या चारचाकी गाडीने क्रेटा गाडीला समोरून मागील चाकाला धडक दिली. यामध्ये चारचाकी विन्तो गाडी जाग्यावर फिरल्याने त्याची धडक दुचाकी गाडीला बसली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघतातामध्ये दुचाकी बुलेट गाडीचे चारचाकी vinto गाडीचे मोठे नुकसान झाले.