आटपाडी : बनपुरीत बैलगाडी शर्यती संपन्न

0
1073

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : बनपुरी ता.आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत मोठ्या गटातील करगणीचे राहुल पुकळे यांच्या, तर चौसा गटात हणमंत बाबर यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकवला.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव पाटील युवा मंचाने बनपुरी येथे मोठा आणि चौसा गटात मिनिटावरील बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष महादेव पाटील, उपसरपंच सुरेश काळे, कुरुंदवाडचे उपसरपंच सागर चवरे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पुकळे, प्रकाश हेगडे, किसन यमगर, शिवाजी काळे, दिनेश पाटील, किसन यमगर, संजय काळे, भाऊसाहेब ढवळे, सारंग सोन्त्रुर आदी उपस्थित होते.

शर्यतीत मोठ्या गटात करगणीचे राहुल पुकळे, सोनके (ता. पंढरपूर) चे संतोष सोनके आणि दत्तात्रय हाके यांच्या बैलजोडीने अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक आला.

चौसा गटात हणमंत बाबर, दत्ता हाके आणि बनपुरीचे संतोष ढवळे यांच्या बैलजोडीने अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्या बैलजोडीला पारितोषिक देऊन सन्मान केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here