आटपाडी : घरनिकी येथे जलजीवन कामाच्या चौकशीच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु

0
1062

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील घरनिकी येथे जलजीवन मिशन कामामध्ये मोठा भष्ट्राचार झाला असून याची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करत, नागरिकांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील घरनिकी येथील जलजीवन योजनेवर सुमारे सव्वा कोटी रूपये खर्चुनही लोकांना पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे, ठेकेदार, अधिकारी यांनी संगनमताने निकृष्ट काम केले असुन योजना सुरू होण्यापुर्वीच योजनेची पोलखोल झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

 

घरनिकी येथे पाणी योजनेसाठी निघालेले टेंडर टेंडर एका नावावर असुन काम दुसराच ठेकेदार करत आहे. शिवाय केलेले काम निकृष्ट आणि लोकांना पाण्यापासून बंचित ठेवलेले आहे. योजनेच्या कामात मोठा गोलमाल झाला आहे. पाण्यासाठी योजना पाण्यापासूनच वंचित ठेवत आहे. योजनेत अनेक त्रुटी असल्याचे योजनेच्या सुरुवातीलाच उजेडात आले आहे.

 

त्यामुळे घरनिकी येथील जलजीवनच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचार बाबत ठेकदार, अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आज दिनांक २७ पासून घरनिकी येथे महिपतराव पवार, अक्षय माने, महेश पोतदार, अमोल मेटकरी, विकी बेरगढ़ आदिंनी आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणस्थळी आटपाडीचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांनी भेट दिली.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here