आटपाडी : शेटफळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा “या” दिवशी

0
777

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये माझा गाव माझा विकास या अंतर्गत सन २०२५-२०२६ चा आराखडा करण्यात येणार आहे. गावातील नागरिकांनी या ग्रामसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सुरेखा इंगवले, उपसरपंच सोमनाथ गायकवाड, ग्रामविकास अधिकारी रोहिदास कोळी यांनी केले आहे.

 

शेटफळे येथील बाजार पटांगण येथे बुधवार दिनांक १५ रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे, या ग्रामसभेमध्ये मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करणे व येणाऱ्या आर्थिक वर्षाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

 

माझा गाव माझा विकास अभियानांतर्गत सन २०२५-२०२६ साठी ग्रामविकासाचा आराखडा तयार करताना पुढील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. हा आराखडा गावाच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या विविध योजनांचा समावेश करून तयार केला जातो. यामध्ये रस्ते डांबरीकरण आणि दुरुस्ती. शुद्ध पाणीपुरवठा योजना लागू करणे. वीजपुरवठा सुधारणे, LED स्ट्रीट लाईट लावणे. शाळा आणि अंगणवाड्यांचे जीर्णोद्धार. शैक्षणिक सुविधा, संगणक प्रयोगशाळा व ग्रंथालये उभारणे. प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक कार्यक्षम बनवणे. महिला व बालकल्याणासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे. वृक्षलागवड मोहीम राबवणे. सौरऊर्जेचा वापर प्रोत्साहन देणे. शेतकरी कल्याण आणि रोजगार शेततळे उभारणे, ठिबक सिंचनासाठी मदत करणे आदी कामांचा समावेश आहे.