माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील उंबरगाव येथील शिवाजी डोंबाळे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्याचा सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी सत्कार केला.
जिद्द, चिकाटी आणि अंगी मेहनत असल्यावर कोणत्याही परीक्षेत यश मिळविता येते हे शिवाजी डोंबाळे याने दाखवून दिले आहे. पोलीस व भारतीय सैन्य दलामध्ये त्याला भरतीसाठी अनेक वेळा त्याला अपयश आले असले तरी त्याने या अपयशाने खचून न जाता यश खेचून आणले. त्याची महाराष्ट्र पोलीस दलाच्या ठाणे पोलीस पदी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाप्रमुख अनिल पाटील, विनायक पाटील, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन उत्तम जाधव, उंबरगावचे रमेश दडस, युवा नेते समाधान शिनगारे यांच्यासह आटपाडी बाजार समितीचे माजी संचालक विष्णू अर्जुन, आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कैलास शेंडगे, इंजि. समाधान गोरवे, युवा नेते चंद्रकांत काळे आदी मान्यवरवर उपस्थित होते.